TRENDING:

Kolhapur Beheda Tree: कोल्हापूरचं 'ते' झाड पाहायला परदेशातून लोक येतायत, नेमकं काय आहे खास?

Last Updated:

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील खेडे गावामध्ये तब्बल 600 वर्षे जुना बेहडा बहुगुणी वृक्ष सापडला आहे. या बहुगुणाी वृक्षाची उंची 120 फूट असून 70 फुटाहून जास्त तर त्याचा घेर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या अवाढव्य आणि दुर्मिळ झाडाला वारसा वृक्ष म्हणून निवडले जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतात आजही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या नामशेष होत चालल्या आहेत. सोबतच काही गोष्टी सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. भारतात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पाहण्यासाठी फक्त भारतीयच नाही तर, परदेशी नागरिकही मोठ्या प्रमाणावर उत्सुक असतात. अशातच सध्या कोल्हापूरातील एक गोष्ट पाहण्यासाठी भारतीयांसोबतच परदेशी नागरिकही फार उत्सुक आहेत, नेमकी ती वस्तू कोणती आहे? ती पाहण्यासाठी परदेशी नागरिक का आतुर आहेत. जाणून घेऊयात.
Kolhapur Beheda Tree: कोल्हापूरचं 'ते' झाड पाहायला परदेशातून लोक येणार, नेमकं काय आहे खास?
Kolhapur Beheda Tree: कोल्हापूरचं 'ते' झाड पाहायला परदेशातून लोक येणार, नेमकं काय आहे खास?
advertisement

ऐतिहासिक ओळख प्राप्त झालेलं कोल्हापूर सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला सह्याद्रीचा वारसा लाभलेला आहे. वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) आंतरराष्ट्रीय नकाशावर यावे, या उद्देशातून प्रयत्न सुरू आहेत. आता अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील खेडे गावामध्ये तब्बल 600 वर्षे जुना बेहडा बहुगुणी वृक्ष सापडला आहे. या बहुगुणाी वृक्षाची उंची 120 फूट असून 70 फुटाहून जास्त तर त्याचा घेर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या अवाढव्य आणि दुर्मिळ झाडाला वारसा वृक्ष म्हणून निवडले जाणार आहे.

advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील हे दुर्मीळ झाड वारसा वृक्ष ठरून आंतरराष्ट्रीय नकाशावर येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शाहूवाडी- पन्हाळ्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वृक्षाची पाहणी करण्यासाठी येत्या गुरुवारी (27 नोव्हेंबर) लंडनहून काही प्रतिनिधी खेडे गावाला भेट देणार असल्याची माहिती आमदारांनी पत्रकार परिषदेत दिली. खेडे गावातील 600 वर्षे जुनं हे अवाढव्य वृक्ष आजही ऊन- वारा पाऊस याला तोंड देत समर्थपणे उभा आहे. याचा शोध आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर कोल्हापूर या निसर्गप्रेमी संस्थेने लावला असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

advertisement

आझाद हिंद नेचर कोल्हापूर यांच्या सहकार्याने बेहडा वृक्षासारख्या अनेक दुर्मिळ वृक्षांचा दस्तऐवज जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे. आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी 60 लोक वेगवेगळ्या झाडांवरती अभ्यास करत असल्याचे सांगितले. 27 नोव्हेंबर रोजी आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह लंडन येथील अरबोरिकल्चरल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पारकर, फिलिप स्माईल, वैभव राजे आणि राहुल मगदूम खेडे गावाला भेट देणार आहेत. यावेळी निसर्ग अभ्यासक सुहास वायगंणकर, पारितोष उरकुडे, डॉ. प्रवीण जाधव, सुनील मुळे, अपर्णा जाधव आदी उपस्थित होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाप-लेकाने दुबई गाजवली, दुबईतील 100 किमी ट्रायथलॉन 6 तासांच्या आत केली पूर्ण
सर्व पहा

'बेहडा' हे वृक्ष 600 वर्षांचा असून त्याची उंची 120 फूट तर त्याचा घेर 70 फुटाहून अधिक आहे. इतक्या अवाढव्य झाडाचा विस्तार 8000 स्केअर फुटांपेक्षा जास्त आहे. या वृक्षांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Beheda Tree: कोल्हापूरचं 'ते' झाड पाहायला परदेशातून लोक येतायत, नेमकं काय आहे खास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल