नेमकं प्रकरण काय?
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (PMPML) 'आपली पीएमपीएमएल' नावाचे अधिकृत ॲप आहे. यावरून प्रवाशांना तिकीट आणि पास काढता येतो. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी या ॲपचे सर्व्हर डाऊन झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे कोणत्याही प्रवाशाला तिकीट किंवा पास काढता येत नव्हता. अशातच कौस्तुभ मांजरेकर (वय २४) हा तरुण सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावरून प्रवास करत होता.
advertisement
कसं फुटलं बिंग?
कौस्तुभने बसमधील वाहकाला (कंडक्टर) आपल्या मोबाईलमधील पास दाखवला. मात्र, अधिकृत सर्व्हर डाऊन असताना याला पास कसा मिळाला? अशी शंका सतर्क वाहकाला आली. वाहकाने कसून चौकशी केली असता, कौस्तुभने अधिकृत ॲपसारखंच दिसणारं एक बनावट ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये तयार केल्याचं समोर आलं. या ॲपद्वारे तो बनावट पास दाखवून फुकट प्रवास करत होता.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
हा तरुण उच्चशिक्षित असून त्याने काही दिवसांपूर्वीच हे ॲप तयार केले होते. याप्रकरणी कौस्तुभ मांजरेकर (रा. बालाजीनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहकारनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
