मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या शासकीय इंजीनियरिंग कॉलेज मतमोजणीला सुरुवात होणार आहे. याठिकाणी उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत मध्ये येण्यावरून पोलिसांमध्ये वाद झाला. यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींवर लाठीचार्ज केला.
या घटनेनं मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला. विकास जैन असं मारहाण झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. जैन यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओमध्ये किंकाळ्या, आरोळ्या आणि आक्रोश ऐकायला येत आहे.
advertisement
तर काही व्हिडीओजमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर उमटलेले व्रण देखील दिसून येत आहेत. या घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
