विशेष म्हणजे राज्य सरकारकडून नव्याने देण्यात येणाऱ्या या परवान्यांपैकी 96 परवाने राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिले जाणार आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. मात्र दारु विक्री परवान्यांची ही खिरापत सर्वपक्षीयांना मिळणार असल्यानं सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनीही तेरी भी चूप मेरी भी चूपचा पवित्रा घेतला आहे.
मद्यविक्री परवान्यांचं सर्वपक्षीय 'कॉकटेल'
advertisement
भाजप- 5 नेते- 40 परवाने
राष्ट्रवादी काँग्रेस- 4 नेते- 32 परवाने
राष्ट्रवादी (शरद पवार)-3 नेते -24 परवाने
पंकजा मुंडेंचा मुलगा, आर्यमन पालवे यांच्या रॅडीको एन.व्ही. डिस्टिलरीजला परवाने दिले जाणार असल्याची माहिती आहे.
नितीन गडकरी यांचे पुत्र, सारंग गडकरी हे संचालक असलेल्या मानस अॅग्रो इंडस्ट्रीजला परवाने दिले जाणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांचे पुत्र , जय पवारांचे व्यावसायिक भागीदार सदानंद बापट यांच्या अॅडलर्स बायो एनर्जी, असोसिएटेड ब्लेंडर्सला परवाने दिले जाणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचा मुलगा, प्रतीक पाटील हे अध्यक्ष असलेल्या राजाराम बापू पाटील सहकाही साखर कारखान्याला परवाने दिले जाणार आहेत...
माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे पुतणे, महेश देशमुख संचालक असलेल्या लोकमंगल माऊली इंडस्ट्रीजलाही मद्यविक्रीचे परवाने दिले जाणार आहे...
यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोणतेही नवे मद्य परवाने दिले नाहीत, असे ते म्हणाले.