TRENDING:

Dilip Khedkar : घटस्फोट, लग्न, पुन्हा घटस्फोट, पूजा खेडकरच्या वडिलांचा प्रतिज्ञापत्रात नवा खुलासा

Last Updated:

Dilip Khedkar : बरखास्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि गैरवर्तणूक यामुळे वादात अडकलेली बरखास्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत ते अहमदनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. यासाठी दिलीप खेडकर यांनी अर्ज दाखल केला असून त्यात संपत्तीसह इतर माहिती दिलीय.
News18
News18
advertisement

दिलीप खेडकर यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत दिलेली माहिती आणि आता दिलेली माहिती यात बराच फरक आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेत दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी मनोरमा खेडकर यांच्याशी लग्न झाल्याचं सांगितलं होतं. तर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करताना आपण विवाहित असल्याची माहिती दिलीप खेडकर यांनी प्रतिज्ञापत्रात दिलीय.

advertisement

लोकसभेला वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. त्यात खेडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर या पत्नी असल्याचं सांगितलं होतं. दोघांच्या नावावर असलेली संपत्तीही जाहीर केली होती. तसंच कुटुंब एकत्र हिंदू कुटुंब असा उल्लेख केला होता.

दरम्यान, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी २००९ मध्ये पुण्यात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांचा घटस्फोट २५ जून २०१० मध्ये मंजूरही झाला होता. घटस्फोटानंतरही दोघेही पती-पत्नी बाणेर परिसरात मनोरमा खेडकर यांच्या मालकीच्या बंगल्यात राहत होते.

advertisement

पूजा खेडकरने वेगवेगळ्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, "तिच्या कुटुंबाचं उत्पन्न शून्य आहे. कारण आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मी आईसोबत राहते." दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती ४० कोटी असल्याचं जाहीर केलं होतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पूजा खेडकर हिच्यावर केंद्र सरकारने कारवाई करताना तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त केलं आहे. युपीएससी परीक्षेत खोट्या प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप तिच्यावर आहे. युपीएससीने तिची उमेदवारी रद्द करत भविष्यात परीक्षेला बसता येणार नाही असंही सांगितलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dilip Khedkar : घटस्फोट, लग्न, पुन्हा घटस्फोट, पूजा खेडकरच्या वडिलांचा प्रतिज्ञापत्रात नवा खुलासा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल