त्याचं झालं असं की, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची शनिवारी शिर्डी मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. प्रियांका गांधी शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे सारथ्य करण्यासाठी प्रकाश खांबकर या तरुणाची गाडी बुक करण्यात आली होती. त्यामुळे शिर्डी विमान तळापासून साई मंदिर, सभा स्थळ आणि शिर्डी विमानतळ असा प्रवास प्रियांका गांधी यांनी प्रकाश यांच्या गाडीतूनच केला.
advertisement
देशातील एका मोठ्या नेत्या आणि गांधी परिवारातील एक व्यक्ती आपल्या गाडीत बसल्याने प्रकाश देखील भारावून गेला होता. त्यामुळे प्रवासादरम्यान त्याने प्रियांका गांधी यांच्याकडे फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र प्रियांका परतीच्या प्रवासासाठी शिर्डी विमानतळावर पोहचताच स्थानिक कार्यकर्त्यांनी भेटीसाठी त्यांना गराडा घातला होता.
या सगळ्या गोंधळात देखील प्रियांका गांधी प्रकाशला विसरल्या नाही आणि काही वेळ त्याच्यासाठी ताटकळत विमान तळावर ताटकळत थांबल्या. आणि नंतर त्यांनी कहा गया वो...अशी विचारणा केली. त्यानंतर दूर उभ्या असलेल्या प्रकाश खांबकर याला बोलावून घेतले आणि सोबत फोटो काढण्याची त्याची इच्छा पुर्ण केली. दरम्यान व्यस्त दौरा आणि धावपळ आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतानाही प्रियांका गांधी दिलेला शब्द विसरल्या नाहीयेत,याचे आता कौतुक होते आहे.