दहशतवाद विरोधी शाखेला एका गुप्त सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. तुमसर येथील आंबेडकर वॉर्डमधील वैभव अनिरुद्ध बोरकर (वय ४०) आणि शिवाजी वॉर्डमधील भारत सुखदेव कोल्हाडकर (वय ३६) हे दोघे मिळून मेहेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरात वेश्याव्यवसायाचा अड्डा चालवत होते. हे आरोपी आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते.
advertisement
या माहितीची खात्री पटल्यानंतर तुमसर पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हाडकर हे दोघे महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते. पुरावे मिळाल्यानंतर, पोलीस पथकाने पंचांसमक्ष त्या घरात छापा टाकला.
घटनास्थळावरून पुरावे जप्त
छाप्यादरम्यान पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. तसेच, या अड्ड्यात सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती भारत कोल्हाडकर याच्या सांगण्यावरून येथे येत होती आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतील काही भाग त्याला देत होती.
या कारवाईनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.