चाकरमानी गणेशभक्त मुंबई-पुण्याहून आपापल्या गावाकडे निघाले आहेत. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे गेल्या ३ तासांपासून ते अडकून पडले आहेत. वाहतूक कोंडीमुळे कराडपासून कोल्हापूरकडे आणि पुण्याच्या दिशेला जवळपास आठ ते दहा किलोमीटर लांब रांगा आहेत.
पुणे आणि कोल्हापूरच्या दोन्ही दिशेला ट्रॅफिक जाम झाल्याने वाहन चालक वैतागले आहेत. अनेकांनी शहरात पर्याय रस्त्याला गाड्या घातल्याने शहरातही वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. सलग सुट्ट्यांमुळे गावाकडे जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले. वाहतुकीची कोंडी फोडताना कराड शहर वाहतूक पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली आहे.
advertisement
सातारा दहीवडीच्या दौऱ्यावर असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच महामार्गावरून प्रवास करणार आहेत. अजित पवार कोल्हापूरमध्ये आज मुक्कामी असतील. त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करायला लागण्याची शक्यता आहे.
