अंकुश काकडे यांच्या म्हणण्यानुसार, मतदान केंद्रावर पहिल्या तीन मतदानांनंतर चौथ्या मतदानाच्या वेळी मशीनवरील लाईटच पेटली नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली की नाही, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, संबंधित ईव्हीएम मशीनमध्ये वेळेचा मोठा फरक आढळून आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ईव्हीएमच्या वेळेत फरक...
ईव्हीएम मशीनमध्ये वेळ सात वाजून ४४ मिनिटे दाखवली जात होती, जी प्रत्यक्ष वेळेपेक्षा तब्बल १४ मिनिटांनी जास्त असल्याचा दावा अंकुश काकडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून, निवडणूक प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
या आरोपांमुळे पुणे महापालिका निवडणुकीत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
