कोल्हापुरात मला परिणाम भोगावे लागले - चंद्रकांत पाटील
मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो, तेव्हा मी डॉल्बीवर बंदी आणली. एकमेव जिल्हा होता, तिथं बंदी होती. मला त्याचे परिणाम भोगावे लागले. गणेशोत्सवात डॉल्बीवर बंदी घातल्याने लोकांनी आमच्या स्टॉलवर मुलांना पाठवणं थांबवलं. पण मला सपोर्ट करणारे लोकं देखील वाढले. अनेक गणेशोत्सवांनी पाठिंबा दिला तर अनेकांनी विरोध केला. तुम्हाला वाजवायचंच आहे ना, मग नाशिक ढोल वाजवा, दिल्लीवरून ढोल आणा. पण मी डॉल्बीला विरोध केला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
advertisement
व्यसन तिथूनच सुरू होतं - चंद्रकांत पाटील
कोथरूडमध्ये डॉल्बी बंद करायचा आहे, कारण व्यसन तिथूनच सुरू होतं, डॉल्बी वाजल्यावर अंगात संचारलं जातं, डॉल्बी वाजताना नाचताना थोडं घ्याव लागतं. काही झालं की दारू, काही झालं की डॉल्बी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी काय चाललं होतं? संभाजी महाराजांचा छावा बघितला आणि आपण इथे काय करतोय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय.
मी म्हणेल चल फूट... - चंद्रकांत पाटील
दरम्यान, मी फकीर माणूस आहे. अनेकजण म्हणाली लोक मतं देणार नाहीत. पण तुमच्या सारख्या लोकांच्या आशीर्वादामुळे इथे आलो, आता म्हणतील डॉल्बीला परवानगी देणार नाही तुम्हाला मत देणार नाही मी म्हणेल चल फूट... मी माझं मत सोडणार नाही. मला आणि माझ्या पक्षाला अशा लोकांची मतं मिळाली नाही तरी चालतील. आमचं काम घराघरात पोहोचलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.