ओव्हरटेकिंगचा थरार, एसटीचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे ही एसटी बस आपल्या मार्गाने जात असताना एका भरधाव कंटेनरने चालकाच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंटेनरची एसटीला इतकी जोरात धडक बसली की एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. बसच्या पुढच्या आणि मागच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
लोणावळ्याचा प्लॅन शेवटचा ठरला! सिनेमा अन् पहाटेचा सूर्योदय; पवई IITच्या 3 मित्रांचा करुण अंत
स्थानिकांची देवदूतासारखी धाव
अपघात होताच प्रवासी किंचाळले घाबरले. बस पलटी झाल्याचे पाहताच जवळच असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बसच्या खिडक्यांमधून आणि दरवाजातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ २ ते ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ४४ जणांचा जीव अगदी थोडक्यात वाचला.
देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले, बोलेरोनं घात केला, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, PHOTO
पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत, ज्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. अशातच अवजड वाहनांची ओव्हरटेक करण्याची घाई प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे. पाटस परिसरात झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कंटेनर चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
