TRENDING:

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! रब्बी हंगामातील ई पीक पाहणीला मुदतवाढ, पण किती तारखेपर्यंत?

Last Updated:

E Pik Pahani : राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२६ साठी सुरू असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२६ साठी सुरू असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या नोंदणीची अंतिम मुदत आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (१७ मार्च) विधानसभेत केली.
e pik pahani
e pik pahani
advertisement

बावनकुळे यांनी सांगितले की, २५ जानेवारी २०२६ पासून ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत केवळ ५५.६९ टक्के नोंदणी पूर्ण झाली असून, सुमारे ४५ टक्के शेतकरी अजूनही या प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. ही टक्केवारी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचावी, यासाठीच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया

advertisement

ई-पीक पाहणी ही पीकविमा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नसल्याने त्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महसूलमंत्र्यांनी केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने सहभाग नोंदवून आपल्या पिकांची माहिती अपडेट करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘अ‍ॅग्रीस्टॅक’ प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश

advertisement

ई-पीक पाहणी अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी प्रशासनालाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जमाबंदी आयुक्त आणि कृषी आयुक्त यांनी समन्वय साधून ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ प्रकल्पातील डेटा लवकरात लवकर पूर्ण करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

यासोबतच पीक पाहणीची पडताळणी वेळेत आणि अचूक पद्धतीने व्हावी, यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

ई-पीक पाहणीचे महत्त्व

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

ई-पीक पाहणी ही केवळ नोंदणी प्रक्रिया नसून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. पीकविमा, नुकसान भरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या नोंदी अनिवार्य असतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी ३१ मार्चपूर्वी ती पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, अनेक योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! रब्बी हंगामातील ई पीक पाहणीला मुदतवाढ, पण किती तारखेपर्यंत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल