TRENDING:

Prakash Ambedkar : काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवत प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींवरच साधला निशाणा, म्हणाले...

Last Updated:

नांदेडमध्ये वंचित आघाडीची सभा पार पडली. यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुजीब शेख, प्रतिनिधी
(प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी)
(प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी)
advertisement

नांदेड : काँग्रेसला बदला घ्यायची संधी आहे. कारण बोफोर्स वरुन राजीव गांधी यांच्यावर आरोप झाले, आता तर पुरावे असताना देखील काँग्रेस शांत आहे. राहुल गांधी चार हजार किलोमिटर चालून आले, मुंबईत म्हणाले की, 'मोदींविरोधात लढाई नाही, अदृश्य शक्तीची लढाई आहे. अरे बाबा एखाद्या मसनजोगीशी लढ' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

advertisement

नांदेडमध्ये वंचित आघाडीची सभा पार पडली. यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

'जे धर्मवादी होते त्यांना वाटत होतं मोदी क्रांती करणार पण त्यांची निराशा झाली. आजच्या टक्केवारीवरुन कळते. उद्या मोदींची सभा आहे. चांगली गोष्ट आहे. मौत के सौदागर का स्वागत है असं मी नाही म्हणत, गुजरात निवडणुकीत सोनिया गांधी म्हणाल्या. त्यामुळे म्हणतो मौत के सौदागर का स्वागत है असे बोर्ड लावा, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

advertisement

'मोदी यांनी काही फार्मसिस्टच्या कंपन्या बंद केल्या. ज्या कंपन्याना बंदी घातली घातक औषध निर्मितीमुळे, पुन्हा त्यांच्या कडून इलेक्ट्रॉल बाँड घेतले आणि पुन्हा कंपन्या चालू झाल्या इलेक्ट्रॉल बाँडबाबत काँग्रेस नेतृत्व मूग गिळून गप्प बसले. काँग्रेसला बदला घ्यायची संधी आहे. कारण बोफोर्स वरुन राजीव गांधी यांच्यावर आरोप झाले, आता तर पुरावे असताना देखील काँग्रेस शांत आहे. राहुल गांधी चार हजार किलोमिटर चालून आले, मुंबईत म्हणाले की, 'मोदींविरोधात लढाई नाही, अदृश्य शक्तीची लढाई आहे. अरे बाबा एखाद्या मसनजोगीशी लढ' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

advertisement

मोदींना आता जर थांबवलं नाही तर अजून कुठले कुठले बंद केलेले औषधी पुन्हा विकल्या जातील, तुम्हाला असा पंतप्रधान पाहिजे का, इलेक्ट्रॉल बाँडचे पैसे जसे भाजपला तसे काँग्रेसला पण आले, काँग्रेस फुसका बार आहे, अशी टीकाही आंबेडकरांनी केली.

'मोदी हेच संघाचे पाय कापत आहेत'

'नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाली, पण मतदार आणि मोदी अशी लढाई इथं सुरू आहे आणि वंचित आघाडी माध्यम झाली आहे. लोकच म्हणत आहेत हे सरकार फेल आहे. संघवाल्यांना सांगतो, मोहन भागवत यांनी मोदींला सांगितले की नाही मला येऊन भेट म्हणून पण गेल्या वर्षांत मोदी भेटायला गेले नाही. संघवाल्यांनो सावध राहा, मोदींना तुम्ही पंतप्रधान केलं पण आता मोदी हेच संघाचे पाय कापत आहेत' असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

advertisement

या माणूस बेभरवशाचा आहे, माझा शब्द म्हणजे गॅरंटी, पण गॅरंटी कोणाला दिली पण तुम्ही लोकांनी बायकोला गॅरंटी दिली ना एकत्र राहू. मोदींनी पण बायकोला गॅरंटी दिली पण पाळली का, आता ते बुडवायला निघाले, अशी टीकाही प्रकाश आंबेडकारांनी केली.

'मोदींना हुकूमशाह व्हायचंय'

अर्थमंत्र्यांच्या पतीची मुलाखत बघितली. त्यात असं म्हणतात मोदींला निवडून दिले तर ही शेवटची निवडणूक, मोदी आले तर देशाचा नकाशा बदलला जाईल असं म्हणतात. त्यामुळे मोदी घाबरले म्हणून मोदी म्हणतात घटना बदलणार नाही, पण मोदी फसवत आहेत. ते घटना बदलणार कारण त्यांना हुकूमशाह व्हायचं आहे. मोदी म्हणतात मला अजून 47 वर्ष राज्य करायचंय. मोदी स्वप्नात जगत आहेत . भांग प्यायलेला pm आपल्याला नको. जो माणूस आपल्या संघटनेशी इमानदार नाही कुटुंबाशी इमानदार नाहीत. मोदी मार्केटिंग करण्यात तरबेज आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Prakash Ambedkar : काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवत प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींवरच साधला निशाणा, म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल