Raigad News : मोहन जाधव, रायगड/ अलिबाग : पावसाळ्यात अनेक इमारती किंवा पूल धोकादायक होत असतात. या धोकादायक इमारतींना खाली करण्याच्या सूचना देण्यात येत असतात. अशीच बाब पुलांच्या बाबतीतही घडते. त्यामुळेच रायगडमधील 8 पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले असून या पुलांवरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.तसेच जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी मार्ग देखील जाहीर करण्यात आले आहेत.त्यामुळे अवजड वाहनांना आता प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
advertisement
रायगड जिल्ह्यात पावसाळ्यामुळे असुरक्षित झालेल्या 8 धोकादायक पुलांवरून अवजड वाहतुकीवर तातडीने जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा आदेश जारी केला असून, स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार या पुलांची भार क्षमता अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. वीजना कन्सल्टिंग इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत या सर्व कमकुवत पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्या अहवालानुसार अखेर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा आणि पोयनाड-उसर मार्गांवरील हे आठ पूल संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत असल्याने सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालक व ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सुद्धा प्रशासनाने दिला आहे.
'या' पुलांवर बंदी
वीजना कन्सल्टिंग इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत या सर्व कमकुवत पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्या अहवालानुसार अखेर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा आणि पोयनाड-उसर मार्गांवरील हे आठ पूल संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत असल्याने सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अवजड वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग
अ.क्र. 1 ते 5 साठी: अलिबाग – पेझारी नाका – सांबरी – वेलशेत – आंबेघर – भिसे खिंड मार्गे रोहा
अ.क्र. 6 व 7 साठी: अलिबाग – उसर – वावे मार्गे रेवदंडा
अ.क्र. 8 साठी: पांडवा देवी – पोयनाड – पेझारी – श्रीगाव मार्गे देहेन.
पावसाळ्यात हे पुल वाहतुकीसाठी असुरक्षित झाले असल्याने वाहनचालक व ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे. तसेच सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सुद्धा प्रशासनाने दिला आहे.
