मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सावंत हे पियाजिओ रिक्षा घेऊन गोरेगावच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या वाहनात दोन प्रवासी देखील होते.यावेळी गोरेगाव मार्गावरील ताम्हाणे शिर्के ते कासार मलाई दरम्यान त्यांच्या वाहनाचा ब्रेक फेल झेल्याची घटना घडली. रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने वाहन रस्त्याच्या कडेला आदळल्याची घटना घडली.
या अपघातात रिक्षा चालक असलेले संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख देखील होते. त्यांच्यसोबत प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या शांताराम काळीदास धोकटे आणि शर्मिलाबाई तुकाराम धोकटे हे गंभीररित्या जखमी झाले होते. यानंतर त्यांना माणगाव उप जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
दोन एसटी बसची समोरासमोर धडक
रायगडमध्ये दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती आहे.रायगडाकडे जाणारा रस्ता अतिशय अवघड आणि नागमोडी वळणांचा आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी सांदोशी गावाजवळची ही घटना आहे.
नागमोडी वळणांचा चालकांना अंदाज न आल्याने एसटीचा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.अपघातात दोन्ही बसचे काहीसे नुकसान झाले आहेत. बसच्या समोरील (दर्शनी) भागाचे नुकसान झाले आहे. बसच्या पुढील काचा फुटल्या आहेत.