Raigad News : रायगड जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांना पोलिसांनी अटक केली आहे. जयेंद्र भगत यांच्या घरात छापा टाकल्यानंतर पोलिसांना एका वन्यप्राण्याचा मांस आढळून आलं आहे.त्यामुळे जयेंद्र भगत यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे.या कारवाईने रायगडमध्ये खळबळ माजली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांनी फणसाड अभयारण्यात भेकराची शिकार केली होती. या शिकारीनंतर त्यांनी भेकराचे मास घरात ठेवून घेतले होते. खरं तर वन्यजीवांची शिकार करण्यास बंदी असताना देखील त्यांनी अशाप्रकारे कायद्याचे उल्लंघन करून शिकार केली होती. त्यानंतर जयेंद्र भगत यांनी भेकराची शिकार करून त्याचे मास आपल्याच घरात ठेवल्याची माहिती गुप्त माहितीदाराच्या आधारे माहिती मिळताच त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक एस. व्ही. लांडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जयेंद्र भगत यांच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्या दरम्यान जयेंद्र भगत यांच्या घरातील फ्रिजमधून सुमारे एक किलो मांस जप्त केले होते. पोलिसांनी जप्त केलेले भेकराचे मास आणि जयेंद्र भगत यांना वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वन विभागामार्फत केला जात आहे.
जयेंद्र भगत यांचा पूर्वइतिहास गुन्हेगारीचा आहे.तसेच प्राण्याची शिकार करताना त्यांच्यासोबत आणखी एक साथिदार होता. या साथिदाराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वन विभागाकडून तपासणीअंती प्राण्याची खरी जात निश्चित होणार आहे. पोलीस अधीक्षक ऑचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. पोलिसांनी वनविभाग यांच्याकडे बेकरीचा मास आणि भगत यांना ताब्यात देण्यात आले आहे .आता वनविभाग काय भूमिका घेते याच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.तसेच जयेंद्र भगत यांना बंदूक कोणी दिली? आणि ते किती दिवसापासून शिकार करत होता? या सर्व अंगाने तपासाला सूरूवात केली आहे.
