TRENDING:

Raigad News : रायगडमध्ये महायुती फुटली, तटकरेंनी गेम फिरवला, गोगावलेंना मोठा झटका

Last Updated:

 रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील भरत गोगावले यांच्यातला संघर्ष सर्वश्रूत आहे. पण हा संघर्ष आता महानगरपालिकेच्या तोंडावर पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Raigad News : मोहन जाधव, रायगड, प्रतिनिधी : रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील भरत गोगावले यांच्यातला संघर्ष सर्वश्रूत आहे. पण हा संघर्ष आता महानगरपालिकेच्या तोंडावर पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण महाड नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाली आहे. या युतीमुळे महायुती फुटली आहे. तसेच याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे अर्थात भरत गोगावले यांना बसण्याची शक्यता आहे.
raigad politics
raigad politics
advertisement

रायगड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या महाड नगरपालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा केली. खासदार सुनील तटकरे व भाजपचे रायगडचे नेते सतीश धारप यांच्या प्रयत्नातून ही युती झाल्याचे बोलले जात आहे. या युतीसोबत दोन्ही पक्षामध्ये फॉर्म्युला ठरल्याचीही माहिती समोर आली आहे.त्यामुळे फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीला जवळपास 15जागा तर भारतीय जनता पार्टीला 5 ते 6 असे जागावाटप झाले असून नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे.

advertisement

दरम्यान या भाजप राष्ट्रवादीच्या युतीने महायुती फुटली आहे.त्याचबरोबर आता महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिंदे गटाविरोधातच राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाची लढाई होणार असल्याने नगरपालिका निवडणूक रंजक मोडवर पोहोचली आहे.

आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असे आम्ही दोन्ही पक्ष संयूक्तपणे निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. तसेच महाडमध्ये जसं आम्ही करतो आहे तसेच रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणी आम्ही अशाप्रकारची यूती करून निवडणूक लढवणार आहोत,असे देखील अनिकेत तटकरे यांनी सांगितले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

दरम्यान भाजपसोबत युती संदर्भात आपल्या भाषणातून अनेक वेळा अनुकूलता दाखवणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.दरम्यान यावर आता गोगावले काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raigad News : रायगडमध्ये महायुती फुटली, तटकरेंनी गेम फिरवला, गोगावलेंना मोठा झटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल