नेमकं काय घडलं?
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता साखरे यांचे सासरच्या मंडळींशी गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होता. हा कौटुंबीक वाद इतका विकोपाला गेला की, यातून रागाच्या भरात प्राजक्ता यांनी टोकाचं पाऊल उचललं. प्राजक्ता यांनी घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी धाव घेत प्राजक्ता यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
advertisement
दोन लहान मुलं झाली पोरकी
प्राजक्ता साखरे यांना दोन लहान मुलं आहेत. कौटुंबिक वादामुळे या लहानग्यांनी आपल्या आईला गमावलं आहे. क्षणभराच्या रागातून उचललेल्या टोकाच्या पावलामुळं संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. प्राजक्ताने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर प्राजक्ता यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी तत्काळ करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी सासरच्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. करमाळा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, ते याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत. कौटुंबीक वादाचं नेमकं कारण काय होतं? सासरच्या मंडळींकडून काय त्रास होता ? या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.
