एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को पार्कमध्ये दसरा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यातून बोलताना रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच निधन कधी झालं?त्याची बॉडी किती दिवस मातोश्रीवर होती? काढा माहिती, हे मी जबाबदारीने बोलतोय,असे राम कदम म्हणाले.
दोन दिवस बाळासाहेबांची बॉडी का ठेवली उद्धव ठाकरे यांनी, तुमचं अंतर्गत काय चाललं होतं? आठ दिवस मी मातोश्रीच्या बाकडावर झोपलो होतो.सगळं कळत होतं. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते.हे ठसे कशासाठी घेतले होते? असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी केला. बाळासाहेबांच मृत्यूपत्र कुणी केलं?कधी झालं? कुणाच्या सह्या होत्या? काढा सगळ्यांची माहिती. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार घेणाऱ्या डॉक्टरांनाही विचारा, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा हव्यास होता.त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजलि दिली होती.त्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाशी बांधली,अशी टीका देखील रामदास कदम यांनी केली.आज हे राज ठाकरे यांच्याकडे भीकेचा लोटा घेऊन जात आहेत,आता एक काय 10 भाऊ आले तरी काय नाही,असेही रामदास कदम म्हणाले.