TRENDING:

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

Last Updated:

रत्नागिरीत भुकंपाचे धक्के बसल्याची घटना घडली आहे. आज रात्री 8.19 मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी मोजण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ratnagiri News : कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक चाकरमानी या पालखीसाठी आपआपल्या गावी गेले आहेत.या दरम्यान रत्नागिरीत भुकंपाचे धक्के बसल्याची घटना घडली आहे. आज रात्री 8.19 मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी मोजण्यात आली आहे.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
advertisement

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार,12 मार्च 2026 रोजी 8.19 मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 16.92 उत्तर व रेखांश 73.44 पूर्व या दरम्यान रत्नागिरी परिसरात जमीनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद करण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

रिष्टर स्केलवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली आहे.त्यामुळे हा एक सौम्य धक्का होता.यामुळे काही वेळ नागरीक घराबाहेर पडले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही वित्तहानी आणि जिवीतहानी झालेली नाही आहे.पण या घटनेने गावात घबराट पसरली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल