मिळालेल्या माहितीनुसार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मुंबई-गोवा हायवेवरील रत्नागिरी तालुक्यातील हद्दीतील 5 अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वे करण्यात आले. यामध्ये कशेडी बोगदा, वेरळ फाटा, भोस्ते घाट, बोरज टोलनाका, लोटे एमआयडीसी यांचा समावेश आहे. अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Ro-Ro Ferry: बाप्पाच पावला म्हणायचं! आता मुंबईतून कोकण फक्त 5 तासात, रो-रो सेवेची सुरुवात
advertisement
मुंबई-गोवा हायवेवरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करणे शक्य झालं आहे. पण, या बोगद्यात दरवर्षी चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न उभे ठाकते. काहीना काही कारणास्तव हा बोगदा सतत बंद करावा लागतो. यंदा मात्र, गणेशभक्तांची यातून काही अंशी सुटका झाली आहे. दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमेतेने वाहतूक सुरू असल्याने गणेशभक्तांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला आहे.
कशेडी बोगद्यात यापूर्वी अनेकदा वीजपुरवठा खंडीत होण्याच्या आणि पाणी गळतीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. पुन्हा या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याला सतर्कतेचे निर्देश दिले गेले आहेत. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग खात्याने दोन्ही बोगद्यांची व्यवस्थित पाहणी केली आहे.