विधानसभेची मोहीम फत्ते केल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा किल्ला सर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक शिबीर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डीत पार पडत आहे. या अधिवेशनाला अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाववकुळे तसेच भाजपचे सर्व मंत्री, जिल्हाध्यक्ष, तालुक्याध्यक्ष आणि जवळपास १५ ते २० हजार कार्यकर्ते उपस्थित आहेत.
advertisement
राष्ट्रीयत्वाची आणि लोककल्याणकारी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवा
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निर्देशानुसार रविंद्र चव्हाण यांची शनिवारी रात्री कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अधिवेशात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला २० जानेवारी पर्यंत दीड कोटी सदस्य करायचे आहेत. २८८ विधानसभेत आपल्याला प्रत्येक घरात जाऊन आपली राष्ट्रीयत्वाची आणि लोककल्याणकारी विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. प्रत्येक बूथवर २००पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य आपल्याला करायचे आहेत. प्रत्येक जण त्या त्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने व योजनाबद्ध पद्धतीने काम करत असल्याचे ते म्हणाले.
संघटन पर्वामध्ये घर चलो अभियान
देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक रचना लावली आहे. काल सर्व जिल्हाध्यक्ष यांना कशाप्रकारे नोंदणी करायची आहे, याबाबत मार्गदर्शन केले आहे. याची गरज काय? याबाबत कालच्या बैठकीत महत्त्व देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. संघटन पर्वामध्ये घर चलो अभियानाच्या माध्यमातून अजून तीनवेळा लोकांच्या घरापर्यंत जायचे आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
ती कॅप काढली, आता अधिक सदस्य नोंदणी करता येईल
याआधी २५० सदस्यांचा कॅप लावण्यात आलेली होती. ती कॅप काढावी अशी मागणी केली जात होती. आता तीच कॅप १ हजार सदस्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिक सदस्य नोंदणी करता येईल, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
