दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना समज दिली आहे. महायुतीत वाद होईल, अशी वक्तव्य टाळा, असं शिंदेंनी धंगेकरांना सांगितलं आहे. पण शिंदेंनी समज देऊनही रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे. पोलिसांवर नामुष्की आली आहे. चंद्रकात पाटील यांच्या आजूबाजूला याला जबाबदार आहेत. कोथरुड भागात आमदार आणि मंत्री भाजपचे आहेत. त्यांनाच प्रश्न आम्ही विचारणार. मी पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारत आहे. निलेश घायवळ प्रकरणात दादांना (चंद्रकांत पाटील) प्रश्न विचारल्यावर समीर पाटलांना राग आला. सांगलीत समीर पाटील यांच्यावर काय काय गुन्हे दाखल आहेत? ते मी दाखवले. तेच घायवळ टोळीला पोषक वातावरण तयार करत असतो, असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला.
advertisement
भाजप माझ्यावरच टिकेचा भडीमार करत आहे. पण पुण्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी कुणी माझ्याशी कुणी बोलत नाही. पोलीस म्हणाले की तुमच्यावर गुन्हे दाखल करायची तयारी झाली आहे. आम्ही आदेश येण्याची वाट बघतोय, असा गंभारी आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी केला.
रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी मला 'तुम्ही वाद होईल असे बोलू नका' असं सांगितलं आहे. पण मी फक्त प्रश्न विचारले आहेत. पण मला भाजपच्या सोशल मीडियावरून ट्रोल केलं जात आहे. तुम्ही माझ्या कुटुंबावर आला आहात. मी कधी तुमच्या कुटुंबावर आलो नाही आणि येणारही नाही. आमची तशी संस्कृती नाही. माझ्या लहान मुलावर हल्ला केला गेला. माझ्यावर जी कारवाई होईल, ती मी भोगायला तयार आहे. माझं घर उद्ध्वस्त झालंय, पण मी मागे हटलो नाही. एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून मी पक्षात आलोय. समीर पाटील हा चंद्रकात दादांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्यासाठी पोलिसांसोबत तयारी करतोय", असा दावा धंगेकर यांनी केला.