गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने केली. या आंदोलनात मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याचे चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणल. मात्र, संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचाराचा भडका उडाला. या भडक्यानंतर पोलिसांनी काही भागात संचार बंदी लागू केली आहे. तर, दुसरीकडे नागपूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
संघाने काय म्हटले?
नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबाच्या थडग्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वक्तव्य समोर आले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. सुनील आंबेकर यांनी म्हटले की, औरंगजेबाचा मुद्दा हा आता प्रासंगिक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या कबरीबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. नागपूरमधील हिंसाचाराबाबत त्यांनी म्हटले की, "कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजातील निकोप वातावरणासाठी चांगला नाही. मला वाटते की पोलिसांनी या हिंसाचाराची दखल घेतली असून ते त्याची सखोल चौकशी करतील, असे प्रतिपादनही आंबेकर यांनी केले.
