सांगोला परिसरात अलीकडेच जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्यांना पाठवण्यास गोरक्षकांनी विरोध दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. त्यावेळी भाषण करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली.
सदाभाऊ खोत यांनी शेतकर्यांच्या सभेत आपल्या भाषणात म्हटले की, "शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाईची बाजारात विक्री केलेली नाही. हा हजारो वर्षांचा इतिहास असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नांगराच्या फाळाचा उल्लेख करत गावरान भाषेत थेट इशारा दिला. मात्र या इशाऱ्यादरम्यान त्यांची जीभ घसरली. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला लागलो, मला धमक्या यायला सुरू झाल्या. अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय, तुम्ही जर माझ्या वाटेला गेला. तर तुमच्या xxx नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा, अशा शब्दांत खोत यांनी इशारा दिला.
advertisement
गोरक्षकांविरोधात गोपालक सेना उभी करणार...
राज्यातील गोरक्षकांच्या विरोधात गोपालक सेना आपण उभी करणार आहोत, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले. राज्यात गोधन हे गोशाळा नव्हे तर शेतकरी सांभाळत असतो. मात्र गोरक्षाकडून शेतकऱ्यांना त्रास होतो. असे खोत यांनी म्हटले. या मोर्चावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षक हे खंडणी घेऊन त्रास देतात. गोरक्षक हे रक्षक नव्हे भक्षक आहेत, असा थेट आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
