ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणात एकूण ८ आरोपींना अटक केली होती. पण आता सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या आरोपींना अटक केली होती. त्या आरोपींपैकी एका आरोपीचं इन्स्टाग्राम अकाऊंट अॅक्टीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू असल्याने विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.
advertisement
संबंधित अकाउंटचं नाव ‘हिमेश मामीडवार 302’ (हिम्या शूटर) असं असून, या अकाउंटवर आरोपीच्या हातात बेड्या घातलेला फोटो प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवण्यात आला आहे. शिवाय पोलिसांच्या हातात हात घातलेले काही फोटो पोस्ट केल्याची माहिती देखील समोर आली आहे. एवढंच नव्हे तर अकाउंटवरील प्रत्येक पोस्टवर भडक पंजाबी गाणी लावण्यात आली असून, कॅप्शनमध्येही आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर शब्दांचा वापर करण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर संबंधित पोस्टवर अनेक आक्षेपार्ह कमेंट्स देखील आल्या आहेत.
हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलिसांनी अटक केलेला आरोपी सोशल मीडियावर कसा काय अॅक्टीव्ह आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे अकाऊंट खरंच अॅक्टीव्ह असेल तर हे अकाऊंट स्वत: आरोपीच वापरत आहे की त्याचं अकाऊंट इतर कोणती व्यक्ती वापरत आहे? असा संशयही आता व्यक्त होत आहे.
