TRENDING:

दादांच्या नेत्याने पैसे वाटल्याचा आरोप, साहेबांचे कार्यकर्ते सांगलीत भिडले; अंगावर धावून जात आमदाराकडून शिवीगाळ

Last Updated:

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडीचे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून देखील गेले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : सांगली महापालिका निवडणुकांमुळे वाातवरण तापले आहे. मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडीचे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून देखील गेले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
News18
News18
advertisement

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग 20 मधून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडून या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराकडून करण्यात आला आहे.त्यानंतर मिरजेतल्या जवाहर चौक येथील आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वादावादीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी देखील उपस्थित होते,तर या वादावादी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार देखील घडला आहे.

advertisement

इद्रिस नायकवडी यांचा नेमका आरोप काय? 

या घटनेनंतर पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले.दरम्यान मतदार याद्यांमधले असलेले घोळ,त्यामुळे मतदार यादीतील नावे आणि स्लिप बाबत नागरिकांनी आपल्या कार्यालयाजवळ गर्दी केली होती, मात्र विरोधकांकडून या ठिकाणी येऊन नागरिकांना दमदाटी करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे.

सांगलीतील राजकारण तापलं

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तो एक निर्णय अन् शेतकऱ्यांचं पालटलं नशीब, 8 कोटींची उलाढाल, प्रयोग ठरला भारी!
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे सांगलीतील राजकारण अधिकच तापल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांच्या नेत्याने पैसे वाटल्याचा आरोप, साहेबांचे कार्यकर्ते सांगलीत भिडले; अंगावर धावून जात आमदाराकडून शिवीगाळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल