घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनास पाठविण्यात आला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसांत झाली आहे .
मयुर साठे हा तरुण वॉचमनचे काम करतो. सध्या तो मिरज तालुक्यातील सोनी या गावात कुटुंबासोबत राहत होता. मयत मयुर आणि त्याचा मित्र बुधवारी दिवसभर सोबत राहून दारू पिऊन हॉटेलमध्ये पार्टी केली. मयत मयुर साठे आणि प्रताप चव्हाण हे लहानपणापासून मित्र आहेत. दोघांनाही दारू प्यायचे व्यसन आहे. मयत मयूर याने आरोपी प्रताप याच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याच्या कारणावरून मयूर आणि प्रताप या मित्रांमध्ये वाद झाला. या रागातून मित्राने बुधवारी मध्यरात्री कुपवाड औद्योगिक वसाहतमधील महावितरण कार्यालयाच्या बाजूला डोक्यात दगड घालून जागीच ठार केला. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसताच मारेकरी घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.
advertisement
दरम्यान, सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून घटनेचा अधिक तपास मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणिल गील्डा हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
