2024 ची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी वेगळी ठरली. त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीनं अवघ्या देशाचं लक्ष वेधलं होतं. अशा परिस्थितीत महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते संजय काका पाटील , ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी अपक्ष विशाल पाटलांनी धूळ चारली. विशाल पाटील अपक्ष खासदार झाले. आज संसदेत नवनिवर्वाचीत खासदार विशाल पाटलांनी जोरदार भाषण केलं. पहिलीचं संधी विशाल पाटलांनी गाजवली. त्यांच्या भाषणातील मुद्दे देखील तितकेच लक्षवेधी होते.
advertisement
विशाल पाटील भाषणात काय बोलले?
नवनिर्वाचीत खासदारांना संसदेत मनमोकळेपणाने बोलू द्या, असं खुद्द पंतप्रधान मोदींनी आधीच स्पष्ट केलं होते. त्यानुसार अपक्ष पण आता काँग्रेसला पाठिंबा दिलेले खासदार विशाल पाटलांना देखील संधी मिळाली. भाषणासाठी मिळालेल्या पहिल्या संधीच विशाल पाटलांनी देखील सोनं केलं, विशाल पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: सांगली आणि कोल्हापूरातील पुरस्थितीवर विशेष जोर दिला. "अलमट्टी धरण आणि कोयना धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाने पाणी पातळी वाढलीयं, आणि यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करावी...कर्नाटक सरकारसोबत सुसंवाद राखावा" अशी मागणी विशाल पाटलांनी केली. यामुळे निश्चितच जिल्ह्यातील प्रश्नांबाबत त्यांची तळमळ दिसून आली.
सांगलीची लढत ठरली होती लक्षवेधी:
सांगली लोकसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद नव्हता. ठाकरेंच्या शिवसेनेने लागलीच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे मतदारसंघात ताकद असणाऱ्या काँग्रेसच्या विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्या जिव्हारी हा मुद्दा लागला होता. अशा परिस्थितीत विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला लढत अवघड आणि तिरंगी होईल असं वाटत होतं. मात्र, निकालसमोर आले तेव्हा विशाल पाटील यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी विजय झाला होता. विशाल पाटलांनी 5 लाखांहून अधिक मतं मिळाली. त्यामुळे भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय पाटील यांना धक्का होता.
Union Budget 2024 : 'लाडका बिहार, लाडका आंध्र; मग महाराष्ट्र...', सुप्रिया सुळेंचा बजेटवर निशाणा
विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा:
पुढे राजकीय वातावरण शांत झाल्यानंतर दिल्लीत जात विशाल पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भेट घेतली, आणि लागलीच काँग्रेसला पाठिंबा जाहीर करून टाकला. आज संसदेत खासदार विशाल पाटील यांनी पहिलं भाषण देखील एकदम जोमात केलं.