TRENDING:

किरकोळ वाद, सलमानवर कोयत्याने वार; नववीच्या विद्यार्थ्याने शाळेत केला हल्ला

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
असिफ मुरसल/सांगली :  सांगलीत एका शाळेत विद्यार्थ्याने विद्यार्थ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होता. या वादातून एका विद्यार्थ्याने धक्कादायक पाऊल उचललं. त्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केला. त्यामुले एकच खळबळ उडाली आहे. आरवाडे हायस्कूलमधील ही धक्कादायक घटना आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

सलमान मुल्ला असं हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.  हल्ला करणारा संशयित आणि हल्ला झालेला असे दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. एकमेकांना चिडवाचिडवी सुरू होती. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयिताने सोमवारी दप्तरातून कोयता आणला होता. सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर त्याने दफ्तरातील कोयता बाहेर काढला आणि बाकावर बसलेल्या सलमानच्या मानेवरच कोयत्याने वार केला. सलमानला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा वार अडवताना सलमानच्या हातावरही हातावरही जखम झाली आहे.  हल्ला केल्यानंतर संशयित विद्यार्थी पसार झाला आहे.

advertisement

मोबाईल मागितला म्हणून बाप चिडला, चिमुकल्याच्या आयुष्याचा शेवट केला; सोलापूर हादरलं

जखमी सलमानला शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी उचलून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास नेले. तिथून विश्रामबागच्या खासगी रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या मानेच्या जखमेवर 35 टाके घालण्यात आले. उपचारानंतर सलमानची प्रकृती थोडीसी स्थिर आहे.

सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला आहे. या प्रकाराने शाळेत खळबळ उडाली आहे. भरशाळेत हल्ला झाल्यानंतर मुलांमध्ये घबराट निर्माण झाली.

advertisement

अगं ऐकतेस का...! बायकोने ऐकली नाही हाक; म्हणून नवऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल

दोन वर्षांच्या मुलासमोरच पत्नीची गळा चिरून हत्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

लातूर शहरात एका व्यक्तीने त्याच्या लहान मुलासमोर पत्नीची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतीनगरमध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रेश्मा अब्दुल शेख (वय 22) ही महिला पतीकडून होणाऱ्या मारहाणीमुळे त्रस्त होती. या त्रासाला कंटाळून ती तिच्या माहेरी आई-वडिलांसोबत राहात होती. तिचा पती अब्दुल युनूस शेख इस्लामपुरा चौकात राहत होता. मंगळवारी रेश्मा तिच्या दोन वर्षांच्या मुलासह घरात एकटी होती. त्यावेळी तिचा पती घरी आला आणि त्याने रेश्माला धमकवलं. त्यानंतर त्याने रेश्मावर हल्ला केला आणि मुलासमोर तिचा गळा धारदार शस्त्रानं कापला आणि तो तेथून फरार झाला. रक्तानं माखलेला मुलगा घराबाहेर पडला तेव्हा आसपासच्या लोकांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर लोकांनी पोलिसांना घडलेल्या घटनेविषयी माहिती दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
किरकोळ वाद, सलमानवर कोयत्याने वार; नववीच्या विद्यार्थ्याने शाळेत केला हल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल