आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना पत्र लिहिण्यावर त्यांनी म्हटले की, कबर हटवण्यासाठी पत्र लिहिण्याची गरज नाही. राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार आहे. त्यांचे पोलीस आहेत. बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती असेही त्यांनी म्हटले.
advertisement
देवेंद्र फडणवीसांचा फोटो पाहिला आहे...
संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे कार सेवा करण्यासाठी जाताना नागपूर रेल्वे स्टेशनवरचा फोटो आपण पाहिला आहे. आता त्यांनी त्याच पद्धतीने वर्षा बंगल्यावरून बाहेर पडावं. जय श्रीराम अथवा जय भवानी, जय शिवाजी असे वाक्य लिहिलेला रुमाल डोक्याला बांधावा. हातात कुदळ फावडे घ्यावे आणि त्यांचे जे पाच ते सहा वीर आहेत, या सर्वांनी तिकडं जावे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्य तुमचं, पोलीस तुमचं, सगळं तुमचं असताना तुम्हाला कोणी अडवल, एकदाचा काय तो निर्णय करा असेही राऊत यांनी म्हटले.
सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच....
परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच झाली असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला आहे. गृहमंत्र्यांनी यापूर्वी असे काही झालेच नाही असे म्हटले होते.मग आता या अहवालानंतर कारवाई कोणावर करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
