फलटणमध्ये शरद पवार गटाचा पराभव झाल्यानंतर संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या मनात चलबिचल सुरू असून सत्ताधारी अजित पवार यांच्या पक्षात जाऊन जनहिताची कामे करवून घ्यावी, असा त्यांचा मानस आहे. त्याच दृष्टीने येत्या काही दिवसांत ते निर्णय घेणार असल्याचे कळते.
लवकरच घरवापसीची शक्यता
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे विधानसभा निवडणुकीवेळी द्विधा मनस्थितीत होते. परंतु त्यांनी त्यावेळी पक्ष सोडला नाही. दुसरीकडे त्यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर 'हीच ती वेळ' म्हणत अजित पवार यांना रामराम ठोकला. परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचे मतपरिवर्तन होऊन घरवापसी करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
advertisement
रणजितसिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळले होते
भाजपचे नेते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या पक्षात विधानसभा निवडणुकीआधी प्रवेश केला होता.
परंतु काही महिन्यातच ते घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रवादीत इन्कमिंग, राजेंच्या प्रवेशावर लवकरच निर्णय
संजीवराजे यांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी अजित पवार गटातूनही सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावर लवकरच निर्णय होईल. पण अजूनही पदाधिकारी नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल, असे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
फलटणधून दीपक चव्हाण यांना पराभव
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली होती, त्याआधी अजित पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु निंबाळकर कुटुंबच पवार यांना साथ देत असेल तर आपणही तिकडे गेले पाहिजे, अशी भावना झाल्याने दीपक चव्हाण यांनी पवार गटात प्रवेश केला. परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सचिन पाटील यांनी चव्हाण यांना पराभवाची धूळ चारली.