रणजितसिंह देशमुख काँग्रेसचे माण-खटाव तालुक्यातील नेतृत्व असून पक्षांशी एकनिष्ठ आहे. कराडला प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताला लावलेल्या बॅनरवर विद्यमान जिल्हाध्यक्ष यांना डावलून रणजितसिंह देशमुख यांच्या फोटोचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याचे समोर आले आहे.
जिल्हाध्यक्ष निष्क्रिय ठरतोय, त्यांना बदला, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची निवडणुकीनंतर मागणी
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सातारा जिल्ह्यात घरघर लागली असून अनेजण पक्षातून बाहेर पडले आहेत. काँग्रेस पक्षातून अनेकजण बाहेर पडत असताना जिल्हाध्यक्ष निष्क्रिय ठरत असल्याचे
advertisement
सांगून कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी करीत आहेत.
कराडला पृथ्वीराज चव्हाण-रणजितसिंह देशमुखांची चर्चा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रणजितसिंह देशमुख यांची काही दिवसापूर्वी कराडला बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाध्यक्षपद रणजितसिंह देशमुख यांच्याकडे देण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे आता एका निष्ठावंत कार्यकर्त्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.