TRENDING:

सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? आधी कलेक्टर साहेबांच्या सूचना वाचा आणि मगच जा...

Last Updated:

Satara Tourism: धबधब्यांच्या शेजारी, दरी कडेला सेल्फी काढण्यास पर्यटकांना बंदी आहे तसेच गाडीत मोठ्या आवाजात गाणी वाजविण्यावर सुद्धा साताऱ्यात पर्यटकांना बंदी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, ठोसेघरचा धबधबा, सज्जनगड, आणि कोयना धरण यांसारखी ठिकाणे पर्यटकांना खूप आवडतात. पाऊस पडायला सुरुवात झाली की पर्यटकांची पावले साताऱ्याकडे वळतात. मात्र याच काळात काळजी न घेतल्याने पर्टटकांसोबत अनेक दुर्घटना देखील घडतात. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सातारा पर्यटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
सातारा पर्यटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
advertisement

सातारा जिल्ह्यात होणाऱ्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटकांना मार्गदर्शक सूचनांचा आदेश काढत पर्यटन स्थळांवर जाण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना दुर्घटना होणार नाही, पर्यटन जीवावर बेतणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

advertisement

जोरदार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक पर्यटक पाण्याच्या प्रवाहाचा विचार न करिता धबधब्यांच्या शेजारी, धबधब्यांखाली उभे राहण्याचे धाडस करतात. यामुळे अपघात होतात तसेच घाटमाथ्यावरून प्रवास करताना पर्यटकांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शक सूचनांचे पत्र जारी केले आहे. पर्यटकांनी साताऱ्यात येताना आणि आल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत विशेष आवाहन केले आहे.

advertisement

पर्यटकांना कोणत्या गोष्टी करता येणार नाही...?

-पर्यटनाला येताना मद्य बाळगू नये

-मद्यपान करून गाडी चालवू नये

-मोठ्याने गाणी वाजवत ध्वनी प्रदूषण करू नये

-धबधब्यांच्या शेजारी, दरी कडेला सेल्फी काढण्यास बंदी

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? आधी कलेक्टर साहेबांच्या सूचना वाचा आणि मगच जा...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल