साताऱ्याच्या फलटणमध्ये महिलेची अंद्धश्रद्धेतून हत्या?
फलटणच्या विडणी गावात ऊसाच्या शेतात महिलेचे शीर धडावेगळे करून शेजारी एका कापडावर हळदी कुंकू, काळी बाहुली आणि महिलेचे केस सापडल्यामुळे परिसरात अघोरी प्रकारातून खून केल्याची चर्चा आहे.
विडणी गावातल्या पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या शेतात खून करून मृतदेह फेकून देण्यात आला आहे. या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगवेगळे केलेला मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
advertisement
हल्ला झालेल्या महिलेचे नाव अद्याप कळू शकलेले नाही
हत्या झालेल्या महिलेचे अद्याप कळू शकलेले नाही तसेच कुणी हत्या केली, हे देखील कळू शकलेले नाही. तपासातून लवकरच सर्व समोर येईल, असे घटनास्थळावर आलेल्या पोलिसांनी सांगितले.
Location :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
January 17, 2025 8:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिलेचं शीर धडापासून वेगळं, मृतदेहाशेजारी लिंबू मिरची हळद कुंकू, अंद्धश्रद्धेतून हत्या?