याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचा पहिला उमेदवार ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरच राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहता आले नाही, मात्र त्यांनी सभेतील नागरिकांसोबत फोनवरून संवाद साधला, यावेळी त्यांनी आगामी फलटण विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
advertisement
दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाषणादरम्यान अजित पवार यांनी थेट फोनद्वारे दीपक चव्हाण यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
