TRENDING:

लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात होर्डिगवरून अजितदादांचा फोटो गायब, चर्चेला उधाण

Last Updated:

लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, मात्र अजित पवार यांचा फोटो लावला नसल्याचं समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा, सचिन जाधव, प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली होती. ही योजना अल्पवधीतच लोकप्रीय ठरली, या योजनेला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. सध्या राज्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं समोर आलं आहे.
News18
News18
advertisement

सातारा शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवरून अजित पवार यांचा फोटो गायब आहे. या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे. मात्र या होर्डिंगवर फडणवीस समर्थकांनी अजित पवार यांचा फोटो लावला नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

काय आहे लाडकी बहीण योजना? 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली, या योजनेंतर्गत पात्र असलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलेंच्या खात्यात दर महिन्याला सरकारकडून दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात होर्डिगवरून अजितदादांचा फोटो गायब, चर्चेला उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल