साताऱ्यातून मोठी बातमी समोर येत आहे, पुणे -बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शनिवार -रविवार सलग दोन दिवस सुट्टी आणि गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेली चाकरमानी यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
advertisement
पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, वाहनांच्या रांगाच -रांगा दिसत आहेत, याचा मोठा फटका हा वाहनधारकांना बसत आहे.
सातऱ्यातील खंबाटकी घाटात वाहनांच्या रांगा लागल्या असून, घाट पूर्णपणे जाम झाला आहे. पहाटेपासूनच घाट जाम झाला आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे निघाल्यानं या महामार्गावर वाहतूक वाढली, त्यामुळे पुणे- बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
या वाहतूक कोंडीचा मोठा फटका हा गणेश भक्तांसोबतच या मार्गावरील इतर वाहनधारकांना देखील बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील वाहतूक प्रचंड धिमी झाली आहे.
