शिवेंद्रराजे भोसले जरांगे पाटील यांच्या भेटीला
सभेदरम्यान प्रकृती खालवल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रुग्णालय गाठून जरांगे पाटील यांची भेट घेत विचारपूस केली. जरांगे पाटील यांच्या साताऱ्यातील दौऱ्यात जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली हे कळाल्यावर मी त्यांना भेटलो आहे. त्यांना तब्बेतीची काळजी घेण्याची विनंती केली. ही लढाई मोठी आहे, समाज तुमच्या पाठीशी आहे. तब्बेत चांगली ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. उद्याचा दौरा पार पाडण्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आम्ही सगळे त्यांना जी मदत आणि सहकार्य लागेल ती करायला तयार आहोत. लवकरच त्यांची तब्बेत चांगली व्हावी ही अपेक्षा असल्याचे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
advertisement
मी भाजप पक्षाचा आमदार असलो तरी, नागपूर अधिवेशनात पहिला विषय मी मांडला होता. पक्षाच्या माध्यमातून गरजू मराठ्यांना आरक्षण मिळावे आणि ते कोर्टात टिकावे अशी आमची अपेक्षा आहे. उमेदवार उभं करणं किंवा पाडणे हा त्यांचा निर्णय आहे. कुणाचे काढून न घेता ज्यांना गरज आहे अशांना आरक्षण दिले पाहिजे आणि टिकले पाहिजे असं दिले पाहिजे, असे आमचे मत असल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले.
वाचा - विधानसभेआधीच भाजपला बंडखोरीचं ग्रहण! परिचारक राबविणार मोहिते-पाटील पॅटर्न?
साताऱ्यात शांतता रॅलीला तुफान प्रतिसाद
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज साताऱ्यात दाखल झाली. साताऱ्यातील शिवतीर्थावरून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी झाले. ही रॅली गांधी मैदान या परिसरात पोहोचल्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर ते खाली बसले.
