TRENDING:

3 टन वजन अन् 8 फूट लांबी, वाघाच्या तोंडाच्या आकाराची ऐतिहासिक तोफ पाहिलीये का? Video

Last Updated:

साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय देखील आहे. यामध्ये वाघाच्या तोंडाच्या आकाराची 2 ते 3 टनाची आणि 7 ते 8 फूट लांब असलेली तोफ आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, सातारा 
advertisement

सातारा : सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साताऱ्यात अनेक गडकिल्ले आहेत. साताऱ्याला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखले जाते. याच साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक जुन्या वास्तू, पत्र, शस्त्र, नाणी, तोफा यासारख्या अनेक अमूल्य वस्तूंचा ठेवा जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये वाघाच्या तोंडाच्या आकाराची 2 ते 3 टनाची आणि 7 ते 8 फूट लांब असलेली तोफ आहे.

advertisement

संग्रहालयात ऐतिहासिक जुन्या वास्तू 

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची स्थापना होऊन 50 वर्षे पूर्ण झाले आहेत. या संग्रहालयात ऐतिहासिक अश्या जुन्या वास्तू जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. याच संग्रहामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या तोफा आहेत. यामध्ये संग्रहालयाच्या मुख्यद्वाराजवळ वाघाचे तोंड असलेली तोफ आणि 3 माशाचं नक्षीकाम असलेली ऐतिहासिक तोफ आहे. सोळाव्या ते सतराव्या शतकामधील या तोफ संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या या संग्रहालयामध्ये नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या कलाकृतींच्या आणि वेगवेगळ्या सालातील तोफा आहेत. या तोफासाठी गाडे तयार केले आहेत. तोफेसाठी लागणाऱ्या गोळ्या देखील प्रदर्शनासाठी सातारा संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले आहेत.

advertisement

100 हून अधिक दुर्गरक्षक एकत्र आले अन् उभारलं छत्रपती शिवरायांचं अनोखं स्मारक, Video

या तोफाचां वापर किल्ल्यावरून लांब पल्ल्याच्या गनिमावर लढाईमध्ये निशाणा करता यावा यासाठी करण्यात येत होता. या तोफा सोळाव्या ते सतराव्या शतकातील आहेत. या तोफा साताऱ्यात नवदुर्ग येथून आणण्यात आल्या आहेत. या दोन्ही तोफा या पंचधातूपासून तयार करण्यात आल्या आहेत. पंचधातूवर ड्रॅगन मासे यांची कलाकृती देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाघाची तोंड असलेली तोफा बांगडीमध्ये तयार करण्यात आली आहे. ही पंचधातूपासून तयार करण्यात आलेली आहे. या तोफेची लांबी 7 ते 8 फुटापर्यंत आहे. या तोफीचे वजन 2 ते 3 टन पेक्ष्या जास्त आहे, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अभि रक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
3 टन वजन अन् 8 फूट लांबी, वाघाच्या तोंडाच्या आकाराची ऐतिहासिक तोफ पाहिलीये का? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल