काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे आणि विरतेचे दर्शन होईल. ही वाघनखे आपल्या मराठी भूमीत दाखल झाली आहेत. सुधीरभाऊ लंडनमध्ये गेले त्यांच्यामुळेच याचे दर्शन आज झाले. काही लोक शंका उपस्थित करत आहेत. हे दुर्दैव आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे असते आणि चागल्या कामाला गालबोट लावायचे असते. वाघनखाला गालबोट म्हणजे विरतेचा अपमान करणे आहे. शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अफजलखान शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी आला होता. पण, शिवाजी महाराज यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा वध ही साधी सुधी घटना नव्हती. आपण त्यांच्या .बद्दल बोलले म्हणजे वाघनखे जास्त वेळ आपल्याकडे राहतील. बाहेर देखील पाहत होतो. सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद पहायला मिळत होता", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिली.
advertisement
वाचा - शरद पवार भाकरी फिरवणार, रोहित पाटलांनंतर आणखी एका तरुणाला विधानसभेत उतरवणार!
"सुधीर भाऊ तुम्ही वेळेवर ही वाघनखे आणली. वेळेवर म्हणजे वेगळा विचार करू नका. शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वाघ नखं म्हणजे महाराष्ट्राची शान. त्यांची शिकवणूक आणि प्रेरणा आपण अमलात आणली पाहिजे. आपला निर्धार पक्का असतो तेव्हा मातीचे ढिगारे देखील पोकळ वाटतात. जनतेच्या कल्याणाचे स्वप्न आपण साकार करत आहोत. पराक्रम आणि शूरता ही आपल्या डोळ्यासमोर आहे. शिवाजी महाराज यांनी मुघलांना नेस्तनाभूत केले. हिंदवी स्वराज्य घडवणे हा शिवाजी महाराज यांचा ध्यास होता. शिव छत्रपतीच्या गनिमी काव्याने प्रेरणा घेतली", असं वक्तव्य शिंदेंनी केलं.