सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरी सातारा येथे 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी दाखल होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज आहे. हा सोहळा अत्यंत दिमाखदार व राजेशाही थाटात व्हावा, याची तयारी सुरू झाली आहे.
लंडनच्या म्युझियम मधून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल होत आहेत. या वाघनखांच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी हा एक शाही स्वागत सोहळा व्हावा, यासाठी झांज पथक, ढोल पथक ,ताशे, स्वागत सोहळ्यासाठी संपूर्ण शहर व जिल्हाभर स्वागत कमानी उभारण्यात येत आहे.
advertisement
तसेच बॅनर्स, पोस्टर्स, संग्रहालया भोवतालची अतिक्रमणे काढून स्वच्छता केली जात आहे. यासोबतच संग्रहालयाची सजावट, विद्युत रोषणाईवरही विशेष भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलीस बँडच्या वतीने महाराष्ट्र गीत वाजवण्यात येणार आहे.
कोरोनाकाळात नोकरी गेली, गावी परतून सुरू केला व्यवसाय, आज महिन्याला तब्बल इतक्या रुपयांची उलाढाल
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि देशभरातील नागरिकांना शिवप्रेमींना पाहता यावी आणि या वाघनखांच्या सुरक्षेसाठी यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही वाघनखे पाण्यासाठी तिकीटही ठेवण्यात आले आहे. या ऐतिहासिक वाघांची सुरक्षिततेसाठी सेन्सॉरची उच्च दर्जाची प्रणाली तयार करण्यात आली आहे.
वाघनखे जेथे ठेवली जाणार आहेत, ते बुलेट प्रूफ कवच आहे. वाघ नखांसाठी एक ठराविक तापमान असावे लागते. याची सुविधाही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात आली आहे. या तापमानाचे कंट्रोलही लंडनमध्ये समजणार, अशी हायटेक टेक्नॉलॉजी सातारातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सुरू केली आहे, असे सांगण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील दररोज प्रत्येकी 2 शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पाहण्यास निशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इतर प्रेक्षकांना 10 प्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत वाघनखे पाहण्यास खुले राहणार आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा प्रेरणादारी क्षण असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मोठ्या संख्येने ही वाघनखे पाहण्यासाठी यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनाकांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन शिवप्रेमींना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केले आहे.