advertisement

जिवंत गेला मृत परतला, ज्याची भीती होती तेच घडलं, शेवटचं लोकेशन महाबळेश्वर, साताऱ्यातील तरुण भयावह अवस्थेत

Last Updated:

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमधील केट्स पॉईंट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे.

News18
News18
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमधील केट्स पॉईंट परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. इथं १८ वर्षांच्या एका तरुणाने केट्स पॉईंटच्या ४०० फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सीईटी परीक्षेचा अर्ज भरला नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भगवतसिंह मदनसिंह सोळंकी (वय १८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) अस मृत मुलाचं नाव आहे. सोळंकी कुटुंब हे मूळचे राजस्थानचे असून गेल्या २० वर्षांपासून ते पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे स्थायिक झाले आहे. त्यांचा बाजारपेठेत बेकरी आणि स्वीट्सचा व्यवसाय आहे. भगवतसिंह हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. मात्र, उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सीईटी परीक्षेचा फॉर्म त्याने भरला नव्हता. याच कारणावरून तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता, असे समजते.
advertisement

शुक्रवारपासून होता बेपत्ता

भगवतसिंह हा शुक्रवार, २३ जानेवारी रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. तो बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र, त्याचा कोणताही थांगपत्ता न लागल्याने अखेर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना 'मिसिंग'चा मेसेज पाठवण्यात आला होता.
advertisement

मोबाईल लोकेशनमुळे लागला सुगावा

तपासादरम्यान भगवतसिंहच्या मोबाईलचे लोकेशन महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट परिसरात असल्याचे पोलिसांना आढळले. ही माहिती मिळताच पाचगणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत सह्याद्री ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने शोधमोहीम राबवली. ट्रेकर्सनी ४०० फूट खोल दरीत उतरून शोध घेतला असता, त्यांना भगवतसिंहचा मृतदेह आढळून आला. ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. एका साध्या परीक्षेच्या फॉर्ममुळे मुलाने इतका टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास ढेबेवाडी पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिवंत गेला मृत परतला, ज्याची भीती होती तेच घडलं, शेवटचं लोकेशन महाबळेश्वर, साताऱ्यातील तरुण भयावह अवस्थेत
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement