Ajit Pawar : दादांची सावली दादांसोबतच विरली! विश्वासू अगरक्षकाला लहान लेकराने दिला मुखाग्नी, भावूक करणारा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विदीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री सातार्यातील त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना त्यांच्या 9 वर्षाच्या चिमुकल्याने मुखाग्नी दिला होता. त्यामुळे हे दृष्य पाहून अनेकांना भरून आलं होतं.
Ajit Pawar Bodyguard Videep Jadhav : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीच्या विद्याप्रतिष्ठाणच्या मैदानात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.लाखो चाहते, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत यावेळी अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आला.अजित पवारांसोबत झालेल्या या विमान अपघातात आणखी चार जणांचाही मृ्त्यू झाला होता.यामध्ये एक अजित पवार यांचे विश्वासू अंगरक्षक विदीप दिलीपराव जाधव यांचा देखील समावेश होता. मागच्या 7 वर्षापासून विदीप जाधव अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते.आणि बुधवारी ही सावली देखील अजित पवारांसोबत विरली.विदीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री सातार्यातील त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना त्यांच्या 9 वर्षाच्या चिमुकल्याने मुखाग्नी दिला होता. त्यामुळे हे दृष्य पाहून अनेकांना भरून आलं होतं.
खरं तर मागच्या सात वर्षापासून पीएसओ विदीप जाधव हे अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्यासोबत सावलीसारखे होते.त्यामुळे बुधवारी ते देखील अजित दादांसोबत विमानाने बारामतीत निघाले होते. या दरम्यान विमान कोसळून अजित पवार आणि त्यांचे अंगरंक्षक विदीप जाधव यांच्यासह आणखी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी रात्री विदिप जाधव यांच्यावर त्यांच्या सातार्यातील मूळ गावी तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्याच्या 9 वर्षाच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला होता. हे दृष्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. कारण ज्या वयात त्याचं बापाच्या आंगाखांद्यावर खेळायच वय होतं,त्या वयात त्याला बापाला मुखाग्नी द्यावा लागला होता.
advertisement
#WATCH | Maharashtra: The last rites of Vidip Dilip Jadhav, the personal security officer (PSO) of Deputy CM Ajit Pawar, were performed by his family in their native village in Satara last night. His young son performed the last rites.
Jadhav was also on board the ill-fated… pic.twitter.com/X3BHTddLZO
— ANI (@ANI) January 29, 2026
advertisement
दरम्यान शासकीय सन्मानात पार पडलेल्या या अंत्यविधीत कुटुंबीय, सहकारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण होते.
कोण होते विदीप जाधव?
महाराष्ट्राच्या पोलीस दलात विदीप जाधव हे 2009 मध्ये दाखल झाले होते. चोख काम करण्याची पद्धत आणि शिस्त यामुळे विदीप यांना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. न्यायाधीश जे.एन.सानप यांचे अंगरक्षक म्हणून विदीप यांनी 2010 ते 2013 या काळात काम केले.त्यानंतर 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानंतर 2019 पासून विदीप जाधव आज अखेर अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 4:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : दादांची सावली दादांसोबतच विरली! विश्वासू अगरक्षकाला लहान लेकराने दिला मुखाग्नी, भावूक करणारा VIDEO










