नेमकं काय म्हणाल्या दमयंतीराजे भोसले?
कोरोगाव येथे आमदार महेश शिंदे यांनी आयोजित केलेल्या सभेत बोलताना दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. उदयनराजे हे काँग्रेससोबत होते, तेव्हा काँग्रेसला नेहमी अशी भीती वाटायची की उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, हे कुटुंब राजकारणात पुढे गेलं तर आमचं काय होईल? म्हणून काँग्रेसनं उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं, असं दमयंतीराजे भोसले यांनी म्हटलं आहे. या सभेला आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि भाजप नेत्या प्रिया शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
advertisement
सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे सुरुवातीपासूनच इच्छूक होते. मात्र महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यानं साताऱ्यामधून उदयनराजे यांच्या नावाची घोषणा करण्यास विलंब झाला. मात्र या मतदारसंघातून उदयनराजे यांनाच भाजपानं उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर होताच आता प्रचाराला वेग आला आहे.
