नेमका वाद का झाला?
मुलाने केलेल्या तलवार हल्ल्यात वडील संजय शिंदे हे जखमी झाले असून त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणात अवघा 24 वर्षाचा मुलगा आकाश संजय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण नक्की हा हल्ला झाला तरी का? नेमका वाद का झाला? जाणून घ्या.
advertisement
"बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही"
वयाच्या 24 व्या वर्षी मुलगा आकाश शिंदे याने शर्यतीचा बैल खरेदी केला होता. आकाशच्या शर्यतीच्या बैलांवर लय जीव... वडिलांना त्याने बैल सांभाळायची जबाबदारी दिली. पण वडिलांनी बैलाला नीट सांभाळला नाही, असा आरोप त्याने केला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद पेटला. शर्यतीचा बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही, असं म्हणून वडील संजय शिंदे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केलं. तो एवढ्यावरच थांबला नाही. थेट घरात गेला अन् तलवार आणली.
बापाच्या अंगावर धावून गेला अन्...
तलवार घेऊन आला अन् बापाच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी त्याने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. पण गळ्यावर केलेला वार चुकला अन् वार कानावर बसला. यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने संजय शिंदे यांना दवाखान्यात नेलं. मात्र, पोटच्या मुलाने असं कृत्य केल्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.