सातारा : राज्य परिवहन मंडळाच्या सातारा आगाराच्या ताफ्यात 5 इलेक्ट्रॉनिक बस दाखल झाल्या आहेत. या 5 इलेक्ट्रॉनिक गाड्या सातारा ते स्वारगेट विना थांबा धावणार आहेत. याचा लोकार्पणदेखील करण्यात आयोजित करण्यात आला. या इलेक्ट्रॉनिक बसमुळे प्रवास हा सुखकर झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गाड्या प्रदूषण विरहित असल्यामुळे निसर्गाला धूर ओखणाऱ्या वाहनांमुळे जी हानी पोहोचत होती, ती होत नसल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. या इलेक्ट्रॉनिक बसेस बाबतची अधिक माहिती विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी दिली.
advertisement
सातारा जिल्ह्याला खूप मोठी निसर्ग संपदा लाभले आहे. सातारा जिल्ह्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मौल्यवान दुर्मिळ वनस्पती आहेत. पण धूर ओकणाऱ्या वाहनांमुळे या निसर्गाला हानी पोहोचत होती. त्यामुळे प्रदूषण विरहित गाड्याची मागणी नागरिकांमधून होत होती. राज्यातील विविध विभागात गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक गाड्या दाखल झाले आहेत. त्यामुळे साताऱ्यात या गाड्या याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
अखेर पहिल्या टप्प्यात सातारा विभागाकडे 5 इलेक्ट्रॉनिक बस दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर आणखी काही दिवसात 5 इलेक्ट्रॉनिक बस येणार आहेत. अशाप्रकारे एकूण सातारा ते स्वारगेट महामार्गावर एकूण 10 इलेक्ट्रॉनिक बस धावणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
इलेक्ट्रॉनिक बसचे फायदे काय -
इलेक्ट्रॉनिक बसच्या फायद्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सातारा आगारात दाखल झालेल्या ई-बसेस मधून प्रवास करणे सुखकारक आणि आरामदायी असणार आहे. त्यामुळे सातारकरांनीही या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या इलेक्ट्रॉनिक गाडीची लांबी 9 मीटर आहे. या गाडीची क्षमता 34 सीटर आहे. त्याचबरोबर प्रत्येक सीटवर मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
त्याचबरोबर या बसला एअर सस्पेन्शन देण्यात आले आहे. या इलेक्ट्रॉनिक बसमधून सातारा ते स्वारगेट महामार्गावरचा प्रवास लवकर पूर्ण होणार आहे. ही बस 2 तासात चार्ज होते. त्याचबरोबर सातारा आगारातही चार्जिंग पॉइंट तयार करण्यात आले आहे. एकदा ही बस चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर धावते. त्याचबरोबर पुण्यातही ही बस गेल्यावर चार्जिंग पॉइंट तयार करण्यात आला आहे.
सोलापुरात लसूण 400 रुपये प्रति किलो, आणखी दर वाढणार?, व्यापारी काय म्हणाले?, VIDEO
सातारा ते स्वारगेट या बसच्या 24 फेऱ्या होणार आहेत. तर सध्या 5 बसेस असल्यामुळे 12 फेऱ्या होणार आहेत. यासाठी सातारा ते स्वारगेटचे शुल्क 245 रुपये आहे. तर स्वारगेट ते सातारा 230 रुपये इतके शुल्क आकारण्यात आले आहे. त्याचबरोबर महामंडळाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना सर्व सवलती लागू होणार आहेत. फक्त विद्यार्थ्यांना पासेस सोडून सर्व सवलती सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी दिली.