TRENDING:

हृदयात छिद्र असूनही सज्जनगड सर केला, पण... 16 वर्षीय श्रावणीचा हट्ट ठरला जीवघेणा! 

Last Updated:

करमाळ्याची श्रावणी राहुल लिंमकर, जिच्या हृदयाला जन्मापासून छिद्र होते, ती सज्जनगडाच्या सहलीला गेली. डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला असतानाही, तिने गड सर करण्याचा हट्ट धरला. गडावर पोहोचताच तिने...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : हृदयाला जन्मापासूनच एक लहानसं छिद्र होतं तिला. डॉक्टर नेहमी काळजी घेण्याचा सल्ला देत, उपचारही सुरू होते. तरीही, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याची अवघी सोळा वर्षांची श्रावणी राहुल लिमकर, आपल्या मैत्रिणींसोबत सज्जनगडाच्या सहलीला निघाली होती. तिच्या मनात एकच ध्येय होतं, ते म्हणजे तो उंच गड सर करणं.
Shocking News In Satara
Shocking News In Satara
advertisement

त्याच क्षणी तिचा श्वास थांबला अन्...

ती धीम्या गतीने, पण अदम्य इच्छाशक्तीने पायऱ्या चढत गेली. एक-एक पायरी पार करत, श्वास लागत असतानाही, ती अखेरीस गडाच्या माथ्यावर पोहोचली. तो क्षण तिच्यासाठी एखाद्या विजयापेक्षा कमी नव्हता. डोळ्यात आनंदाश्रू घेऊन, तिने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या वडिलांना फोन लावला. "पप्पा, मी गड चढले!" हे शब्द तिच्या मुखातून बाहेर पडले आणि त्याच क्षणी, तिचा श्वास थांबला. ती अचानक खाली कोसळली.

advertisement

श्रावणीचा हट्ट जीवघेणा ठरला

ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सज्जनगडावर घडली. श्रावणी, दहावीत शिकणारी एक हुशार विद्यार्थिनी होती. करमाळ्यातील एका खाजगी क्लासमधील विद्यार्थ्यांसोबत तिची ही सहल होती. सहलीला निघण्यापूर्वी तिच्या वडिलांनी तिला 'तू जाऊ नकोस' असे सांगितले होते. त्यांच्या मनात भीती होती, कारण त्यांना तिच्या हृदयाच्या विकाराची जाणीव होती. पण श्रावणीने हट्ट धरला आणि ती निघाली.

advertisement

उत्साहाच्या भरात तिने वडिलांना फोन केला अन्...

सज्जनगडावरील वाहनतळावर उतरल्यानंतर पायऱ्या चढून सर्वजण गडाकडे जात होते. श्रावणीही त्या गर्दीचा भाग होती. तिने हळूहळू, थांबत-थांबत का होईना, पण जिद्दीने प्रत्येक पायरी पार केली. गडावर पोहोचल्यावर तिला थोडा दम लागला होता, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि एक वेगळाच आनंद होता. 'हृदयाचा त्रास असूनही मी हे करू शकले,' हा विचार तिला शक्ती देत होता. त्याच उत्साहाच्या भरात तिने वडिलांना फोन केला, "पप्पा, तुम्ही म्हणाला होता नको जाऊ, पण बघा पप्पा, मी गड चढले!" हे वाक्य पूर्ण होताच, तिच्या शरीरातील प्राणवायू कमी झाला आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली.

advertisement

कास पाहण्याचं स्वप्न राहिलं अधुरं

जवळ असलेल्या तिच्या मैत्रिणींनी तिला तात्काळ सावरले. तिची शुद्ध हरपली होती. तिला कसेबसे पायऱ्या उतरवून वाहनतळापर्यंत आणण्यात आले. तिथून तिला तातडीने साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या सहलीनंतर मैत्रिणींचा कास पठारावर जाण्याचा बेत होता. श्रावणीचेही तेच स्वप्न होते, पण दुर्दैवाने ते अपूर्णच राहिले. एका क्षणात आयुष्याची दोरखंड तुटली आणि श्रावणीचे स्वप्न स्वप्नच राहिले.

advertisement

हे ही वाचा : Weather Alert: मंगळवारी हवामानात मोठे बदल, 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

हे ही वाचा : Nag Panchami 2025: नागपंचमीच्या पूर्वसंध्येला शिरोळ्यात नाग पकडण्यास परवानगी, केंद्राकडून नवं पत्रक जाहीर

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
हृदयात छिद्र असूनही सज्जनगड सर केला, पण... 16 वर्षीय श्रावणीचा हट्ट ठरला जीवघेणा! 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल