सातारा : मराठ्यांच्या ऐतिहासिक वारसा सांगणारी अनेक दुर्मिळ साधनं आहेत. नुकतेच साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात लंडनहून आणलेली शिवकालीन वाघ नखं ठेवण्यात आली आहेत. आता याच संग्रहालयात अजून एक दुर्मिळ वस्तू शिवप्रेमींना पाहता येणार आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची नाममुद्रा येथे ठेवण्यात आली आहे. अस्सल चांदीची फारशी भाषेत असणारी ही नाममुद्रा पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळत असल्याने साताऱ्यात इतिहास प्रेमींची गर्दी होत आहे.
advertisement
येसूबाईंची नाममुद्रा ही फारशी भाषेत आहे. या मुद्रेवर तीन ओळींचा लेख आहे. तो वाचताना खालून वर असा वाचावा लागतो. राजा सनह अहद वलिदा राजा शाहू यांच्या मातोश्री येसूबाई, असे शब्द नाममुद्रेवर आहेत. यातील सनह अहद या शब्दाचा अर्थ पहिले वर्ष असा आहे. पारशी भाषेतील प्रथम वर्षाला अहद असे म्हणतात.
इतिहासात या मुद्रेचा शिक्का असलेली एकही पत्र आजपर्यंत संशोधक इतिहास अभ्यासक यांना आढळली नाहीत. येसूबाई या औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांनी स्वराज्यातील सरदारांना पाठवलेल्या पत्रावर ही मुद्रा वापरण्यात आली असावी, असे एखादे पत्र उजेडात आणण्यासाठीचा प्रयत्न इतिहास अभ्यासक मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मोरबे धरण भरले तब्बल 93 टक्के, असा होणार फायदा...
येसूबाईंची नाममुद्रा कशा पद्धतीची -
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय 1960 साली सुरू झाले. त्यात अनेक ऐतिहासिक आणि शिवकालीन वस्तू आहेत. या खजिन्यात महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा साधारणपणे सण 1970 च्या दरम्यान पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयात संचालन मुंबई येथून सातारा सामील झाली याची नोंदही आहे.
सर्वसाधारणपणे ही नाम मुद्रा छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर तयार करण्यात आली असावी म्हणजे 1690 मधील असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ नंतर फारसी भाषेतील हे दुसरीच नाममुद्रा आहे. पण जिजाऊंची नाममुद्रा ही सोन्याची होती तर येसूबाईंची नाममुद्रा ही चांदीची आहे.
येसुबाईंची नाम मुद्रा ही गोलाकार असून तिचा व्यास एक इंच आहे. छत्रपतींच्या ज्या नाममुद्रा आहेत त्या आत्तापर्यंतच्या देवगिरी आणि संस्कृत लिपित आढळतात. मात्र, राजमाता जिजाऊ नंतरची छत्रपती घराण्यातील दुसरी मुद्रा म्हणजे महाराणी येसूबाईंची नाम मुद्रा असल्याचा उल्लेख आढळतो.
ही नाममुद्रा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तयार करण्यात आली असावी, असे देखील त्याच मुद्देवर कोरले गेले आहे, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या अभिरक्षक यांनी सांगितली. प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण भारत देशात राजमाता जिजाऊनंतरची दुसरी मुद्रा ती फक्त न फक्त येसूबाईंचीच आहे, असे देखील सांगितले जाते.
पुण्यात मराठा आरक्षण शांतता रॅली, वाहतुकीत झाला हा महत्त्वाचा बदल, संपूर्ण माहिती
प्राचीन काळापासून मुद्रा म्हणजे शिक्क्यांचा वापर होत आला आहे. शक्य म्हणजे चलनी नाणी नव्हे तर पत्रावरील शिक्के, असा त्याचा अर्थ. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती, संभाजी महाराज यांनीही आपली राजमुद्रा चालवली होती. या राजाच्या मुद्रांना नाम मुद्रा म्हणतात. पत्रावर या मुद्रा अंकित केलेल्या असायच्या, जेणेकरून पत्राच्या अस्सलपणा कळावा आणि इतरही काही हेतूसाठी त्याचा वापर होत होता.
मराठ्यांनी आपल्या पत्रावर शिक्का म्हणजे नाममुद्रा आणि मोर्तब म्हणजे समाप्ती मुद्रा या दोन मुद्रा वापरल्या तर काही पत्रांवर. प्रधानांच्या मुद्रादेखील होत्या. यामध्ये शिक्का हा नेहमी मोर्तबपेक्षा मोठा आकाराचा होता. मोर्तब सूत अशी एक लहान आकाराची आणखी एक मुद्रा असून पत्राच्या शेवटी याचा वापर केला जायचा.
सध्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येसूबाईंची नाम मुद्रा पाहण्यास ठेवली आहे. ही नाम मुद्रा पाण्यासाठी शिवप्रेमी त्याचबरोबर इतिहास अभ्यासक मोठ्या संख्येने गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. भारतातील दुर्मिळ आणि एकमेव नाममुद्रा ही सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.