कराडजवळ असलेल्या एका आश्रमात सेक्स स्कँडल सुरू असल्याचा दावा किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. यात समाजसेविका, राजकारणी आणि इतंकच नाही तर पोलीस सुद्धा सामील असल्याचं किरण माने यांनी म्हटलंय. निराधार मुलींसाठी असलेल्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा हा प्रकार भयानक असल्याचं किरण माने म्हणाले.
किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, कराडजवळील टेंभू गांवातल्या 'छत्रछाया' या निराधार मुलींसाठीच्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा भयानक प्रकार उघडकीला आला आहे ! आश्रम चालवणारी समाजसेविकाच या निराधार अल्पवयीन मुलींना अनेक बड्या धेंडांबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती.
advertisement
अनेक बडे पोलीस अधिकारी या सेक्स स्कँडलमध्ये असल्याचा संशय आहे. तसेच एका मोठ्या राजकारण्याच्या भावाचाही यात समावेश असल्याची चर्चा आहे. असो. आज लाडकी बहिण योजनेच्या चकचकीत इव्हेन्टसाठी 'चीप' मिनिस्टर कोल्हापुरात येणार आहेत. गृहमंत्री नेहमीप्रमाणे 'लापता' आहेत असंही किरण माने म्हणाले आहेत.
बदलापूर प्रकरणावरून किरण माने यांनी सरकारवर टीकाही केली होती. जनतेचा काळीज पिळवटणारा आक्रोश ऐका. क्रूर आणि कोडग्या सत्ताधाऱ्यांनो.. जेव्हा एका लहान लेकरावर बलात्कार होतो ना, तेव्हा ती जखम आणि ती वेदना प्रत्येक स्त्रीला होते. महाराष्ट्रातल्या घरातली एकेक लाडकी बहीण आज बदलापूरमधल्या वेदनेनं कळवळतेय असं किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
